
क्रिती सनॉन ही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत जलवा करताना दिसली. आता क्रिती सनॉन ही थोड्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सनॉन ही आता प्रोड्यूसर बनली आहे.

प्रोडक्शन कंपनी ब्लू बटरफ्लाइजची घोषणा काही दिवसांपूर्वीच क्रिती सनॉन हिने केलीये. दो पत्ती हा चित्रपट ब्लू बटरफ्लाइज कंपनीचा पहिला चित्रपट असणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये काजोल ही मुख्य भूमिकेत आहे. आता काजोल हिच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना क्रिती सनॉन ही दिसली आहे.

क्रिती सनॉन ही म्हणाली की, काजोलसोबत काम करण्याचा अनुभव फार भारी आहे. मी दुसऱ्यांदा काजोलसोबत काम करत आहे. बाॅलिवूडचा माझा दुसऱ्याच दिलवाले चित्रपट होता, त्यावेळी मी काजोलसोबत काम केले.

काजोल ही एक वाइबसारखी आहे, असेही क्रिती सनॉन ही म्हणाली आहे. आता क्रिती सनॉन आणि काजोल यांचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.