Photo : ‘कुंडली भाग्य’ मालिकेचे कलाकार गोव्याला रवाना,पाहायला मिळणार नवा ट्रॅक

मुंबई विमानतळावर कुंडली भाग्य स्टार प्रीता उर्फ श्रद्धा आर्य अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसली.(‘Kundli Bhagya’ serial stars went to Goa for a shoot, new track to be seen)

VN | Updated on: Apr 16, 2021 | 10:42 AM
1 / 6
महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारनं संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सोबतच या संचारबंदीमध्ये टीव्ही मालिकांचं शूटिंगसुद्धा आता 15 दिवस बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी शूटिंग लोकेशनमध्ये बदल केले आहेत. कुंडली भाग्यचे कलाकार मालिकेच्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाले आहेत.

2 / 6

विमानात बसण्यापूर्वी संपूर्ण स्टार कास्टनं विमानतळावर फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज दिली. यावेळी संपूर्ण स्टारकास्ट एका वेगळ्या अंदाजात दिसली.

3 / 6

मुंबई विमानतळावर कुंडली भाग्य स्टार प्रीता उर्फ श्रद्धा आर्य अतिशय स्टाइलिश लूकमध्ये दिसली. या दरम्यान श्रद्धा आर्याने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा पोशाख परिधान केला होता.

4 / 6

कुंडली भाग्य या मालिकेतील सर्व कलाकार विमानतळावर कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळताना दिसले. प्रत्येकाने मीडियासोबत अंतर ठेवून फोटो क्लिक केले.

5 / 6

आता संपूर्ण स्टारकास्ट नव्या ठिकाणी पोचली आहे, त्यामुळे चाहते कुंडली भाग्य मालिकेत गोव्याचा ट्रॅक पाहायला उत्सुक झाले आहेत.

6 / 6

यावेळी मालिकेतील काही महत्त्वपूर्ण कलाकार दिसले नाहीत, अशात आता शक्यता आहे की एकतर मालिकेच्या कथेत बदल करण्यात येतील किंवा उर्वरित कलाकार नंतर गोव्यासाठी रवाना होतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us