Fantasy Bra: अभिनेत्रीने घातली सोने आणि हिऱ्यांची फँटसी ब्रा! किंमत 4,74,68,07,500 रुपये, पाहून थक्क व्हाल
Fantasy Bra: सोशल मीडियावर 4,74,68,07,500 रुपयांच्या ब्राची चर्चा सुरु आहे. हजारो हिरे असलेल्या या ब्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरेजडीत ब्रा परिधान केली आहे. या ब्राची किंमत जवळपास 474 कोटी रुपये आहे. सध्या सगळीकडे या ब्राची चर्चा सुरु आहे.
हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरने १८ ऑक्टोबर रोजी 'व्हिक्टोरियाज सीक्रेट फॅशन शो'मध्ये पदार्पण केले. यावेळी तिने ब्रँडची प्रतिष्ठित 'फॅन्टासी ब्रा' परिधान केली होती.
कायली जेनरने परिधान केलेल्या या ब्राची किंमत ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५ कोटी डॉलर्स) इतकी आहे. भारतीय चलनानुसार या ब्राची किंमत 4,74,68,07,500 आहे,
ही ब्रा लक्झरी ज्वेलरी ब्रँड 'जेकब अँड को.' (Jacob & Co.) सोबत मिळून डिझाइन केलेल्या या ब्रापैकी एक आहे. यामध्ये ७५.५४ कॅरेटच्या पिवळ्या हिऱ्याभोवती ४,४१० नैसर्गिक हिरे जडलेले आहेत.
ही ब्रा तयार करण्यासाठी १५ कारागिरांना १,००० तासांहून अधिक वेळ लागला. विशेष म्हणजे, २०१८ नंतर पहिल्यांदाच 'फॅन्टसी ब्रा' पुन्हा एकदा रॅम्पवर दिसून आली आहे.