
वर्ष 2025 मध्ये अनेक मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन केलं. धुरंधर, छावा, सैयारा आणि कांतारा चॅप्टर 1 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेतच. पण एक प्रादेशिक भाषेतील सिनेमा सुद्धा हिट ठरला.

सर्वात मोठ्या हिट चित्रपटाचा सन्मान गुजराती फिल्म 'लालो: कृष्णा सदा सहायते'ला मिळाला. फक्त ₹50 लाख बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतातील 2025 मधील चांगला प्रॉफिट कमावणारा चित्रपट बनला.

या फिल्मने बॉक्स ऑफिस वर जवळपास 120 कोटी रुपयांच कलेक्शन केलं. या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत भरपूर नफा कमावला. भारतीय सिनेमातील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं.

'लालो: कृष्णा सदा सहायते' या सिनेमाला मोठी स्टार कास्ट, गाणी-डान्स अशा Action सीक्वेंसची गरज पडली नाही. पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. वर्षातील हा मोठा हिट सिनेमा ठरला.

या फिल्मच्या आधी आलेल्या 'सीक्रेट सुपरस्टार' ने जवळपास 6000 टक्के नफा कमावलेला. 'लालो: कृष्णा सदा सहायते' सक्सेसमधून दिसून येतं की, कमी बजेट आणि भक्ति-केंद्रित कथा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते.