Ladki Bahin Yojana 2026: सरकारचा मोठा निर्णय! लाडक्या बहिणींना दिवाळी आधी… थेट निधी वळवला
Ladki Bahin Yojana 2026: राज्यातील लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिलांना फायदा होत आहे. या योजने अंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात. आता दिवाळी आधी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरलेली योजना म्हणून लाडकी बहिण योजना ओळखली जाते. या योजने अंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. आता दिवाळीला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता येणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाला यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
महिला व बाल विकास विभागाला मंजूर झालेल्या या निधीतून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर हा निधी मंजूर झाल्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना मानली जाते. या योजनेद्वारे पात्र महिलांना नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते. दिवाळीपूर्वी निधी मंजूर झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. विभागाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे.