Ladki Bhin e KYC : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, ई-केवायसी सुरू, नेमकी प्रोसेस काय? मोठी अपडेट समोर!

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. या निर्णयाचा लाखो लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे.

| Updated on: Jul 26, 2026 | 4:18 PM
1 / 5
लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची खूपच चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान, आता याच योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

2 / 5

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. या निर्णयाचा लाखो लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे.

3 / 5

तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येईल. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. ही ई-केवायसी कशी करता येईल, असे विचारले जात आहे. याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

4 / 5

परंतु सूत्रांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच ई-केवायसी करण्याचा पर्याय खुला करून दिला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

5 / 5

सद्यातरी ई-केवायसीची संपूर्ण प्रक्रिया अद्याप समोर आलेली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्तळावरच केवायसी कशी करायची, याची माहिती दिली जाऊ शकते. त्यामुळे या संकेतस्थळावर लक्ष द्यावे, असे आवाहन केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us