Ganpati Visarjan Miravnuk 2026 : मुंबईतील प्रसिद्ध गणपती विसर्जनसााठी निघाले, परळच्या गणरायाची जोरदार चर्चा, पाहा 6 फोटो

मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनसााठी निघाले आहेत. या गणपतीच्या विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तर यंदा परळच्या गणरायाची जोरदार चर्चा होत आहे. पाहा 6 फोटो

| Updated on: Sep 25, 2026 | 9:11 AM
1 / 6
मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. गणेशभक्तांकडून लाडक्या बाप्पााला भावपूर्ण दिला जाणार आहे. मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सजली आहे.

मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. गणेशभक्तांकडून लाडक्या बाप्पााला भावपूर्ण दिला जाणार आहे. मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सजली आहे.

2 / 6

लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी निरोपाची आरती घेण्यात आली. त्यानंतर सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी निघाले. रस्त्यावर भाविक, कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

3 / 6

लालबाग, परळ, गणेशगल्ली या सगळ्या परिसरात गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहायला मिळत आहे. या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय.

4 / 6

मुंबईत अनेक उभे गणपती आहेत. अनेक सुंदर गणपती आजच्या दिवशी भाविकांना पाहायला मिळत आहे. तर गणेश मंडळाचे कार्यकर्ते देखील विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे.

5 / 6

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची देखील जोरदार चर्चा होत आहे. या गणपतीचं यंदा 99 वर्ष आहे. तर परळचा गणरायाची जोरदार चर्चा आहे. दोन्ही मूर्ती सुरेख आहेत.‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सर्व गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत.

6 / 6

मुंबईतील सर्व प्रसिद्ध मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत आहे. विसर्जनासाठी ढोलताशांचा गजर केला जात आहे. तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा दिमाखात विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us