लता मंगेशकरांचं 45 वर्ष जुनं गाणं, जे अमेरिकेनं केलं कॉपी; गाण्यावर आकारण्यात आलेला 4000 कोटींचा दंड

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही पोहोचली होती. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केले. मात्र, त्यांच्या एका लोकप्रिय गाण्याची परदेशात परवानगीशिवाय नक्कल करण्यात आली आणि त्यानंतर मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला.

| Updated on: Sep 12, 2026 | 4:07 PM
1 / 5
लता मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 30 हजारांहून अधिक गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम आहेत.

लता मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 30 हजारांहून अधिक गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम आहेत.

2 / 5

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ज्योति' चित्रपटातील 'थोड़ा रेशम लगता है' हे गाणे विशेष गाजले. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले होते. हे गाणे अरुणा ईरानी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

3 / 5

अमेरिकन रॅपर आणि संगीत निर्माता डीजे क्विक यांना या गाण्याची धून आवडली. त्यांनी सिंगर ट्रुथ हर्ट्ससाठी 'Addictive' हे गाणे तयार केले. या गाण्यात 'थोड़ा रेशम लगता है'च्या संगीताचा आणि बीट्सचा परवानगीशिवाय वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

4 / 5

हे गाणे अमेरिकेत लोकप्रिय झाले आणि बिलबोर्ड चार्टच्या टॉप 10 मध्ये 9व्या क्रमांकावर पोहोचले. मात्र, भारतीय संगीत कंपनी सारेगामा यांना या वापराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अमेरिकन संगीत कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली.

5 / 5

सारेगामा यांनी Aftermath, Interscope आणि Universal Music Group यांच्याविरोधात सुमारे 500 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4000 कोटी रुपयांचा कॉपीराइट दावा दाखल केला. न्यायालयाने गाण्याच्या पुढील विक्रीवरही निर्बंध घातले. या घटनेनंतर भारतातही संगीतकार हॅरी आनंद यांनी 'कलियों का चमन' हे गाणे तयार केले, जे रसिकांना पसंत पडले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us