Atul Parchure: अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा घरबसल्या येणार पाहता, कुठे आणि कधी होणार प्रदर्शित!
Atul Parchure: दिवंगत अभिनेते अतुल परचुरे आज आपल्यात नसले तरी, त्याचं नाव जरी समोर आलं तरी, त्यांनी जिवंत केलेल्या भूमीका आजही डोळ्या समोर उभ्या राहतात. आता अतुल परचुरे यांना शेवटच्या सिनेमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यांचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण आपल्या लोकांना महत्त्व आणि वेळ देणं विसरुन जातो. आपल्याकडे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी देखील वेळ नसतो. याच भावनेला स्पर्श करणारा 'अंत एक प्रारंभ' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'अंत एक प्रारंभ' हा सिनेमा अतुल परचुरे यांचा शेवटचा सिनेमा असल्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे, सिनेमा दोन भावांच्य़ा भावनिक नात्याभोवती फिरताना दिसणार आहे. सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे.
राजवीर आणि प्रद्युम्न या दोन भावांची ही कथा आहे. मोठा भाऊ प्रद्युम्न स्वतःची कामे करू शकत नसल्याने त्याला सतत मदतीची गरज असते. अशात कामात असलेल्या राजवीरला भावासोबत वेळ घालवत येत नसल्याने पुढे अनेक अनपेक्षित घटना घडतात. सिनेमातून त्यांच्या नात्याची वेगळी बाजू समोर येत आहे.
सिनेमा विशेष ठरणार आहे कारण, सिनेमा अतुल परचुरे यांच्या निधानंतर प्रदर्शित होणारा शेवटचा सिनेमा आहे. अशात त्यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. सिनेमाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे.
सिनेमात अतुल परचुरे यांच्यासोबत वसीम फरास, अतुल परचुरे, मोहन जोशी आणि गिरीश ओक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार असून. सिनेमाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 6 नोव्हेंबर 2026 रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.