Gold Rate : सराफा बाजारात खळबळ, सोनं तब्बल 40000 रुपयांनी घसरलं, 10 ग्रॅमचा भाव फक्त…धक्काच बसेल!

एकीकडे युद्ध सुरू असताना सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. कारण सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. ही घसरण पाहून सोनं खरेदी करण्याची हीच योग्य संधी असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 7:57 PM
1 / 5
युद्ध चालू झालं की सोन्याचा भाव वाढतो. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं वधारतं. परंतु यावेळी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू होताच सोन्याचा भाव प्रचंड घसरला आहे. आजदेखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

2 / 5
IBJA  नुसार आज बाजार चालू होताच 24 सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,35,141 रुपयांपर्यंत घसरला होता. अगोदरच्या बाजार बंद भावाच्या तुलनेत सोनं दिवसाच्या सुरुवातीलाच 12,000 रुपयांनी घसरलं. चांदीचा भावदेखील 2,01,500 रुपयांपर्यंत कमी झाला.

3 / 5
दरम्यान गेल्या 50 दिवसांपासून सोन्याचा भाव चांगलाच घसरत आहे. आकड्यांत सांगायचे झाल्यास 50 दिवसांत सोन्याचा भाव 25 टक्क्यांनी घसलला आहे. चांदीचा भावही 50 टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याचा भाव कधीकाळी एमसीएक्सवर 4,20,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला होता.

4 / 5
सोन्याचा भाव कधीकाळी 1,76,121 रुपये प्रति 10 ग्रॅम इथपर्यंत वाढला होता. सोन्याच्या भावाचा हा सार्वकालिक उच्चाकं आहे. या भावाची तुलना आजच्या किमतीसोबत करायची झाल्यास सोनं तब्बल 40,980  रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य संधी असल्याचे बोलले जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us