
ॲडव्हेंचर स्पोर्ट करायला कुणाला नाही आवडत...? आपण एकदातरी पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग सारखा साहसी खेळ करावा, असं प्रत्येकाला वाटतं... तुमची अशी इच्छा असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे.

आता असे साहसी खेळ खेळण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही... आपल्या महाराष्ट्रातही तुम्ही या साहसी खेळांचा अनुभव घेऊ शकता....

तुम्ही पॅरामोटरिंग सारखा साहसी खेळ तुम्ही आपल्या महावळेश्वरमध्ये अनुभवू शकता... महाराष्ट्राच्या या प्रसिद्ध पर्यटनस्थळी तुम्ही हे ॲडव्हेंचर करू शकता...

महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने हे खास फोटो शेअर केलेत.आकाशात उंच उंच उडा! ही संधी गमावू नका. महाबळेश्वरमध्ये पॅरामोटरिंगचा थरार अनुभवा, असं आवाहन पर्यटन विभागाकडून करण्यात आलं आहे.

सर्वात थरारक साहस करायला तयार असाल तर तुम्ही आपल्या महाबळेश्वरमध्ये जाऊ शकता. आतापर्यंत थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणार आपलं महाबळेश्वर आता पॅरामोटरिंग स्पॉट म्हणून ओळखलं जात आहे.