
कमी दरात चांगल्या वस्तू मिळाव्यात असं प्रत्येकाला वाटतं... मुंबईत असाच एक मार्केट आहे, जेथे तुम्ही कमी दरात सामान खरेदी करु शकता...

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये स्वस्त दरात कपडे आणि इतर वस्तू देखील मिळतात. मार्केटमध्ये होलसेलच्या दरात कपडे आणि चप्पल मिळतात.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये महिलांसाठी वेग-वेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात. साड्यांचे दर देखील परवडणारे असतात.

एवढंच नाही तर, मार्केटमध्ये रोज घालायचे कपडे देखील कमी दरात मिळतात. मार्केट जवळपास 1869 पासून सुरु आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये कपड्यांशिवाय ड्राय फ्रूट, ग्रोसरी आणि घरातील इतर सामान देखील मिळतं. तुम्ही कधी क्रॉफर्ट मार्केटमध्ये गेले नसाल तर नक्की जा...