
लिंबात भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन असते. तसेच व्हिटॅमिन बी६, फोलेट, पोटॅशियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण बरेच लोक त्याची साल देखील वापरतात. (Photo : Pexels)

लिंबाच्या सालीचा वापर फेस मास्क, एअर फ्रेशनर बनवण्यासाठी केला जातो. लिंबाच्या साली आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे काही जणं लिबांच्या साली खातात. पण यामुळे खरंच फायदा होतो का? चला तज्ज्ञांकडून याबद्दल जाणून घेऊया ( Credit : Meta AI)

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते, लिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. ( Credit : Meta AI)

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. डेड स्किनच्या पेशी काढून टाकण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करू शकते. परंतु त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे महत्वाचे आहे. ( Credit : Meta AI)
