
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते नेहमीच व्यायाम करायला जाण्याच्या अगोदर काही खास पेयांचे सेवन करायला हवे. हे पेय आपले वाढलेले वजन झटपट कमी करण्यास मदत करतात. ही पेय नेमकी कोणतही आहेत. याबद्दल जाणून घेऊयात.

निरोगी शरीर राखण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. रोज सकाळी ग्रीन टी प्या आणि वजन कमी करा. ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे ओवा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी गरम करून प्या.

बडीशेपचे पाणी पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी दूर करते. बडीशेप भिजवलेले पाणी प्यायल्यानेही शरीर थंड राहते. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे बडीशेप एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते रिकाम्या पोटी प्या.

दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून पिल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, व्यायामाला जाण्याच्या अगोदर हे पाणी प्यावे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)