
उन्हाळ्याच्या हंगामात सर्वाधिक सेवन दह्याचे केले जाते. कारण दह्यामुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, बरेच लोक सध्याच्या हंगामात दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन देखील अधिक प्रमाणात करतात.

दुधी भोपळ्याच्या रसाचे अधिक सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे उलट्या, अतिसार आणि इतर आजार उद्भवू शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होऊ शकते.

मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांनी दुधी भोपळ्याचा रस पिणे शक्यतो टाळले पाहिजे. जास्त रस पिल्याने शरीरात साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दुधी भोपळ्याचा रस घेतल्यानंतर अति घाम येणे, भूक न लागणे, खाज सुटणे, डोळ्यांसमोर काळे होणे, अशक्तपणा, चिंताग्रस्तपणा इत्यादी समस्या असल्यास, नक्कीच आपण उशीर न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजेत.

दिवसभरात एक ग्लासपेक्षा जास्त दुधी भोपळ्याचा रस घेतला नाही पाहिजेत. यापेक्षा जास्त रस पिणे आरोग्यास हानिकारक आहे. शक्यतो ताजा-ताजा दुधी भोपळ्याचा रस घेतलेला कधीही चांगला