
आरोग्यासाठी दूध खूप जास्त फायदेशीर आहे. तसेच दुधामध्ये काही घटक मिक्स करून आपण दूध अधिक पाैष्टीक बनवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही दूध आणि गुलकंद मिक्स करून कधी खाल्ले आहे का? दूध आणि गुलकंद मिक्स करून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कामाचा ताण आणि जबाबदारी यामुळे निर्माण होणारा ताण कमी करणे खूप गरजेचे आहे. गुलकंद असलेले दूध प्यायल्याने तुम्ही तणाव बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. यामुळे दररोज रात्री झोपताना गुलकंदचे दूध नक्की प्या.

दूध आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण त्यात गुलकंद मिसळून प्यायल्याने डोळ्यांच्या आरोग्याला फायदा होतो. या दोघांच्या मिश्रणाने डोळ्यांची दृष्टी वाढू शकते.

कोमट दुधाचे सेवन पोटासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र त्यात गुलकंद मिसळून प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. गुलकंदमध्ये आढळणारे मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.

अल्सरची समस्या पोटात गडबड झाल्यामुळे होते. पोट नीट साफ न झाल्यास तोंडात व्रण देखील होऊ शकतात. पोट साफ करण्यासाठी रोज एक ग्लास कोमट दूध गुलकंदसोबत प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)