Side Effects of Celery: या व्यक्तींनी ओवा खाणे टाळावे अन्यथा होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

पोटातील गॅस, आंबटपणा इत्यादींपासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. पण ते जास्तीत जास्त 10 ग्रॅम पर्यंत खाल्ले जाऊ शकते. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते आणि तुम्हाला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या देखील होऊ शकते.

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 4:17 PM
1 / 5
ओव्याचे जास्त सेवन केल्याने पोटातील उष्णता वाढते. यामुळे बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ होण्याची समस्या होण्याची शक्यता असते. अंतर्गत रक्तस्त्राव किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असला तरीही ओव्याचे सेवन करू नये.

2 / 5
पोटातील गॅस, आंबटपणा इत्यादींपासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. पण ते जास्तीत जास्त 10 ग्रॅम पर्यंत खाल्ले जाऊ शकते. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते आणि तुम्हाला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या देखील होऊ शकते.

पोटातील गॅस, आंबटपणा इत्यादींपासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. पण ते जास्तीत जास्त 10 ग्रॅम पर्यंत खाल्ले जाऊ शकते. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते आणि तुम्हाला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या देखील होऊ शकते.

3 / 5
ज्या लोकांना यकृताशी संबंधित कोणताही आजार आहे, त्यांनी त्याचा जास्त वापर टाळावा अन्यथा समस्या वाढू शकते. या व्यतिरिक्त, जे पुरुष वंध्यत्वाच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यांनी त्याचा वापर पूर्णपणे टाळावा.

4 / 5
गर्भवती महिलांनी ओव्याचे सेवन टाळावे. ओव्यामुळे उष्णतेची समस्या निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे स्त्रीची स्थिती गंभीर बनू शकते. गर्भवती महिलेने ओव्याचे सेवन करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

5 / 5
ज्या लोकांना ओव्याची अॅलर्जी आहे. त्यांना ओवा सेवन केल्यानंतर त्वचेवर पुरळ देखील येऊ शकते. जास्त प्रमाणात ओव्याचे सेवन केल्याने त्वचा संवेदनशील होऊ शकते. ज्यामुळे नंतर त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.