Churchgate Station Drone Accidnet : ड्रोन्सचा कंट्रोल सुटला, वानखेडे स्टेडियममधून अचानक चर्चगेट रेल्वे स्टेशनवर येऊन प्रवाशाच्या डोक्यावर कोसळलं
Churchgate Station Drone Accidnet : वानखेडे स्टेडियमवर ड्रोन शो सुरु असताना एक दुर्घटना घडली. चर्चगेट रेल्वे स्टेशनवर एक प्रवाशाला याची किंमत मोजावी लागली. ही घटना घडल्याच समजताच ASI शंकरलाल मीणा, हेड कॉन्स्टेबल गौरव परमार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे आकाश गायकवाड यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.

चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर दोन दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली. प्रवासी रेल्वे स्थानकात थांबलेले असताना अचानक एक ड्रोन येऊन कोसळलं. त्यात एक प्रवासी जखमी झाला. 28 ऑक्टोंबर रोजी ही दुर्घटना घडली. वानखेडे स्टेडियममध्ये एक ड्रोन शो झाला. त्यातलं हे ड्रोन होतं. विरारच्या दिशेने जाणाऱ्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर रात्री 8.10 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमी प्रवाशाची ओळख पटली असून हेमंत प्रकाश महोत्सवकर (37) असं त्यांचं नाव आहे. ते प्लॅटफॉर्मवर उभे असताना अचानक एक ड्रोन येऊन त्यांच्या डोक्यावर आदळलं. यात ते रक्तबंबाळ झाले. जखमी हेमंत प्रकाश यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं.
प्रत्यक्षदर्शीनुसार हे ड्रोन प्रवाशाच्या डोक्यावर येऊन कोसळलं. त्यानंतर एकच रक्तस्त्राव सुरु झाला. ही घटना घडल्याच समजताच ASI शंकरलाल मीणा, हेड कॉन्स्टेबल गौरव परमार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे आकाश गायकवाड यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशाला आधी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरकडून प्राथमिक उपचार दिले. नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
दोन्ही ड्रोन्स ताब्यात घेतली
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमोपचारानंतर त्या प्रवाशाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने लिखितमध्ये स्टेटमेंटही दिलं. 15 मिनिटानंतर त्याने आणखी उपचाराची गरज असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून जीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. चर्चगेट जीआरपीने कोसळलेली दोन्ही ड्रोन्स ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीतून ती दोन्ही ड्रोन्स शो चा भाग असल्याचं समजलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये हा ड्रोन शो होता. नियंत्रण सुटल्यामुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे हे ड्रोन्स चर्चगेट रेल्वे स्थानकात आले असावेत.
#WATCH | Maharashtra: A drone show celebrating Jio Platforms’ IPO is was held at Wankhede Stadium in Mumbai. Organised by BotLab Dynamics, the show showcased Jio’s journey, the Reliance Group’s vision and India’s digital future through synchronised drone formations. https://t.co/gxQiGB0zQL
— ANI (@ANI) October 28, 2026
हे ड्रोन्स थेट स्टेडियममधून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले कसे, काय कारण आहे याचा पोलीस तपास सुरु आहे. काही दुर्लक्षाचा प्रकार आहे की, सुरक्षा मानकांचं उल्लंघन झालं ते पोलीस शोधून काढतील.
