
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आयुर्वेदात म्हटले आहे की, निरोगी व्यक्ती तोच असतो, ज्याचे पाय उबदार, पोट मऊ आणि डोके थंड असते. पण आजच्या काळात सर्वकाही उलटे झाले आहे. चुकीचे अन्न, जास्त ताण इत्यादींचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषत: पोटाच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पोट हे सर्व रोगांचे मूळ मानले जाते. त्याची योग्य काळजी घेतली तर माणूस सर्व समस्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. येथे जाणून घ्या काही खास मार्ग जे तुमच्या पोटातील गॅस, अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी इत्यादी सर्व समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने सकाळची सुरुवात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या. यासाठी पाणी रात्रीच एका भांड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यावर प्या. तांब्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे पोटासाठी फायदेशीर मानले जातात.

फायबर युक्त आहार पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. पचनसंस्था मजबूत राहिल्याने तुमचे अन्न चांगले पचते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे फळे, धान्य, हिरव्या भाज्या, शेंगा इत्यादींचा आहारात समावेश करा. रात्री उशिरा जेवणे टाळाच.

पोटाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोमट पाणी देखील खूप उपयुक्त मानले जाते. रोज जेवणाच्या अर्ध्या तासानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी देखील गरम पाणी पिले पाहिजे.

योगा पोटाच्या आरोग्यासाठी खूप मानला जातो. तसेच सकाळ संध्याकाळ चाला. जेवनानंतर संध्याकाळचा फेरफटका मारा. सकाळी जलद चालण्याचा वेग ठेवा, पण संध्याकाळी चालण्याचा वेग वाढवू नका. रात्रीचे जेवन झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी चाला.