
शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे खाज सुटणे, पुरळ उठते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर गरम पाणी प्या. तुम्ही जितके जास्त पाणी पिताल तेवढी तुमची त्वचा आणि शरीर चांगले राहण्यास मदत होईल.

त्वचेवर लालसरपणा, पुरळ आणि खाज सुटल्यावर बर्फ त्वचेवर लावा. गुलाबपाणी आणि ग्रीन टीसह बर्फ बनवा. हा बर्फ चोळल्याने त्वचेच्या समस्या कमी होतील. त्वचेतील रक्त परिसंचरण सुधारले जाईल.

आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्ही घरी असलात तर थोड्या थोड्या वेळाने चेहऱ्यावर पाणी मारा. यामुळे तुमची त्वचा तेलकट होणार नाही.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये घराच्या बाहेर पडताना नेहमीच आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचा खराब होण्यापासून वाचते. चेहऱ्यासह हात आणि मानेवरही सनस्क्रीन लावा.

जर तुम्हाला उष्णतेमध्ये तुमची त्वचा हायड्रेट ठेवायची असेल, तर तुमच्या स्किन केअर रूटीनमधून शीट मास्क वापरू शकता. याचा त्वचेवर थंड प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, त्वचा हायड्रेटेड राहते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)