
चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो. इतकंच नाही तर अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही त्रास होऊ शकतो.

चहा पिण्यापूर्वी किंवा नंतर दही आणि दह्याचे पदार्थ खाऊ नका. अन्यथा पचनाच्या समस्या निर्माण होतात.

तुम्हाला सकाळी नाश्त्यात फळे खाण्याची सवय असेल तर चहा पिताना किंवा प्यायल्यानंतर लगेच खाऊ नका. चहा पिणे आणि फळे खाणे यामध्ये किमान एक तासाचे अंतर असावे.

'चहा' पिण्यापूर्वी आणि नंतर लोहयुक्त पदार्थ खाऊ नका. असे केल्याने शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी होते. परिणामी, तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

चहा पिण्यापूर्वी किंवा लगेच लिंबाचा रस पिऊ नका. यामुळे गॅस निर्माण होतो आणि पोट फुगण्याची शक्यता असते.

चहा पिताना हळद किंवा हळदयुक्त पदार्थ अजिबात घेऊ नका. अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील.