
राजस्थानचा अलवर हा पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहे. इथे येणारे पर्यटक हे मिठाई नक्कीच सोबत घेऊन जातात. अलवरच्या मिल्क केकची चव अप्रतिम आहे.

जयपूरचे घेवर लोकांचे खूप आवडते. इथे बनवलेल्या गट्टे भाजी आणि पुरीच्या चवीचा मामलाच वेगळा आहे. यासोबतच इथल्या घेवरची चव देखील अप्रतिम आहे.

राजस्थानमधील गजक देखील खूप प्रसिध्द पदार्थ आहे. तुम्ही राजस्थान फिरण्यासाठी गेल्यावर याची चव नक्कीच घ्या.

बिकानेरची भुजिया खूप प्रसिध्द आहे. इथे मिळणारी भुजिया इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळी आहे. भुज्याची भाजीही येथे तयार केली जाते.

दाल बाटी चुरमा या राजस्थानच्या लोकप्रिय खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी तुम्हाला राज्यातील कोणत्याही विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नाही. राजस्थानमध्ये हा पदार्थ सर्व ठिकाणी मिळतो.