
खाद्य तेल अर्थात स्वयंपाकात वापरले जाणारे तेल ही एक अशी गोष्ट आहे, ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही. पण, आजकाल भेसळयुक्त तेल बाजारात झपाट्याने विकले जात आहे. अशा परिस्थितीत आपण वापरत असलेले तेल शुद्ध आहे की, बनावट हे शोधणे खूप कठीण झाले आहे.

तेल खरे आहे की बनावट, हे ओळखण्यासाठी एका भांड्यात दोन ते तीन चमचे तेल ठेवा आणि ते भांडे काही तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. जर, तेलात एक पांढरा थर बनला, तर ते तेल बनावट असू शकते.

आपण तेल टेस्ट ट्यूबद्वारे देखील तपासू शकता. त्यासाठी टेस्ट ट्यूबमध्ये तेलाचे काही थेंब टाका आणि त्यात काही थेंब नायट्रिक आम्ल टाका आणि चांगले मिक्स करा. आता ही ट्यूब गरम करा आणि मिश्रणाचा रंग पहा. जर, रंग बदलला तर तेलात भेसळ असल्याचे होऊ शकते.

तेल शुद्ध आहे की, भेसळयुक्त हे जाणून घेण्यासाठी तेलाचे काही थेंब आपल्या तळहातावर ठेवा आणि जोरात घासून पाहा जर त्यात काही वेगळा वास, किंवा रंग बाहेर आला किंवा रसायनाचा वास आला, तर त्यात भेसळ झाली आहे, हे लक्षात येईल.

तुम्ही मोहरीचे तेल जिभेवर लावून देखील अंदाज लावू शकता की, ते खरे आहे की बनावट. जर तेलाची चव कडू असेल किंवा काळी मिरीसारखी असेल, तर याचा अर्थ ते तेल शुद्ध आहे आणि जर चव केवळ कडू असेल, तर ते तेल बनावट असू शकते.