Mutton Recipe: मटणप्रेमींसाठी मेजवानी! झटपट बनवा अस्सल कोल्हापुरी मटण; चवदार झणझणीत रस्सा

रविवार म्हटलं की अनेकांच्या घरी मांसाहाराचा बेत ठरलेलाच असतो. चिकन, मटण, मासे असे पदार्थ आवडीनं खाल्ले जातात. मात्र नेहमीचा मटण रस्सा आणि सुका मटण खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी अस्सल कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत मटण बनवून पाहा.

| Updated on: Nov 01, 2026 | 3:14 PM
1 / 5
अर्धा किलो मटणासाठी 2 चमचे तेल, 2 कांदे, 6-7 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि 2 टोमॅटो घ्या. याशिवाय अर्धा चमचा हळद, मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि गरम मसाला लागेल. चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि 2-3 चमचे कोल्हापुरी मसाला घ्या.

अर्धा किलो मटणासाठी 2 चमचे तेल, 2 कांदे, 6-7 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि 2 टोमॅटो घ्या. याशिवाय अर्धा चमचा हळद, मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि गरम मसाला लागेल. चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि 2-3 चमचे कोल्हापुरी मसाला घ्या.

2 / 5

घरी मसाला बनवण्यासाठी दालचिनी, लवंग, वेलची, काळीमिरी, तीळ, सुकं खोबरं, धणे आणि जिरे एकत्र घ्या. त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर पेस्ट मिसळा तुम्ही काळा मसाला सुद्धा वापरू शकता. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तुम्ही काळा मसाला सुद्धा वापरू शकता. जेणेकून छान तांबड्या पांढऱ्या रस्स्याचं मटण तयार करता येतं.

3 / 5

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्या आणि पातेल्यात तेल गरम करा. त्यात कांदा तपकिरी होईपर्यंत परतून आलं-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर टोमॅटो आणि सर्व मसाले घालून मिश्रण व्यवस्थित परता.

4 / 5

आता मसाल्यामध्ये मटण घालून 5-10 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून पातेल्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर साधारण 30-40 मिनिटे मटण पूर्णपणे शिजू द्या.

5 / 5

मटण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अशा प्रकारे घरच्या घरी अस्सल कोल्हापुरी चवीचे मटण तयार होईल. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत या मटणाचा आस्वाद घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us