
जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही पपईचे सेवन टाळावे. यामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड एमिनो अॅसिड असते. जे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. सर्वसाधारणपणे हृदयरोग्यांसाठी ते फायदेशीर आहे.

तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असली तरीही तुम्ही पपई खाणे टाळावे. अशा परिस्थितीत पपईचे सेवन केल्याने कॅल्शियम ऑक्सलेट तयार होऊ शकते, जे तुमच्या स्टोनची समस्या वाढवण्याचे काम करते.

रक्तातील प्लेटलेट्स कमी होत आहेत का? जाणून घ्या, लक्षणे; ‘प्लेटलेट्स’ वाढविण्यासाठी या गोष्टी त्वरीत खाणे सुरू करा

गर्भवती महिलांनीही पपईचे सेवन टाळावे. पपईमध्ये लेटेक्स असते, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. यामुळे, प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता लक्षणीय वाढते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई खूप फायदेशीर आहे. पण जर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी असेल तर तुम्ही त्याचे सेवन टाळावे.