
अहलाबादी ताहरी: बासमती तांदूळ, मसाले, दही, पावडर मसाले आणि भाज्या यापासून खास अहलाबादी ताहरी बनवली जाते. त्याची चव खूप जबरदस्त असते. देशाच्या इतर भागात याला व्हेज पुलाव म्हणतात. पण यूपीमध्ये ते ताहरी म्हणून ओळखले जाते.

टुंडे कबाब : ही डिश लखनऊमध्ये खूप फेमस आहे. तिथे त्याला गलोटी कबाब असेही म्हणतात. जर नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असाल तर नक्की एकदा या खास टुंडे कबाबचा आस्वाद घ्या.

पेठा : यूपीमधील आग्रा येथील पेठा देशात खूप प्रसिध्द आहे. इथे येणारे प्रवासी येथील पेठा घेतल्याशिवाय जात नाहीत.

मुरादाबादी डाळ : ही डाळ जितकी चविष्ट आहे. तितकीच पौष्टिक आहे. मुरादाबाद यूपीमध्ये लोकांना ही डाळ मसालेदार पापडीसोबत खायला आवडते.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पेडा देखील खूप प्रसिध्द आहे. हा पेडा खास पध्दतीने तयार केला जातो.