
वैवाहिक जीवनाचा गाडा हा दोन्ही चाकांवर चालतो. त्यामुळे जोडीदाराने एकमेकांचा सम्मान करणं गरजेचं आहे. विचार आणि भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर चांगल्या गुणांना कायम प्रोत्साहन द्यावं. यामुळे नातं मजबुतीने टिकतं आणि जवळीक वाढते.

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या जोडीदारावर कायम विश्वास ठेवावा. तसेच वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. जोडीदाराचा विश्वासघात होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा नातं टिकणार नाही.

वैवाहित जीवनात जोडीदारांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. जोडीदाराला लक्ष्य गाठण्यासाठी कायम प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. तसेच यश मिळाल्यानंतर दोघांनी ते तितक्याच आनंदाने साजरं करणं गरजेचं आहे.

आपल्या जोडीदाराच्या भावना आणि अनुभव समजण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात साथ देण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. यामुळे आपलं नातं आणखी दृढ होतं.

वैवाहिक जीवनात धीर धरणं ही सर्वात मोठी कसोटी आहे. कारण प्रत्येक गोष्ट लगेच होत नाही. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. जोडीदाराच्या काही चुका होत असतील तर त्या माफ करा आणि नव्याने सुरुवात करा. अति तक्रारींमुळे नातं टिकत नाही.