
दररोज दात स्वच्छ करण्यासाठी आपण प्रत्येकजण टूथपेस्टचा वापर करतो. विशेष म्हणजे हे टूथपेस्ट आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. टूथपेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

सुंदर त्वचा

आपण त्वचेवरील सुरकुत्या, काळे डाग, मुरूम घालवण्यासाठी टूथपेस्टमध्ये लिंबू मिसळून चेहऱ्याला लावू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरूम जाण्यास मदत होते.

ताज्या सफरचंदच्या सालीची पावडर, दही, आणि हळद मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण तीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.

आपल्या हाताला पायाला काही पोळले असेल तर त्यावर आपण टूथपेस्ट लावले पाहिजे. यामुळे आपल्याला आराम मिळतो आणि त्रासही कमी होतो. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)