
नागालँड हे भारतातील एक सुंदर राज्य आहे. नागालँडला ‘लँड ऑफ फेस्टिव्हल्स’ या टोपणनावानेही ओळखले जाते. पर्यटनासाठी नागालँड प्रसिध्द राज्य आहे. नागालँडमध्ये सुंदर आणि प्रसिद्ध अनेक पर्यटन स्थळे आहेत.

कोहिमा शहराच्या बाहेरील भागात असलेले नागा हेरिटेज व्हिलेज म्हणून ओळखले जाणारे किसामा गाव हे नागालँडचे एक आकर्षण आहे. डिसेंबर महिन्यात येथे साजऱ्या होणाऱ्या हॉर्नबिल उत्सवादरम्यान गाव एका आठवड्यासाठी लोकांसाठी खुले केले जाते.

खोनोमा गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. नागालँड फिरण्यासाठी गेल्यावर या गावाला नक्की भेट द्या.

नागालँडच्या सुंदर दृश्यांमध्ये जुकू घाटी हे पर्यटनासाठीही खास ठिकाण आहे. ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे खूप खास ठिकाण आहे.