
भुईमुगाच्या शेंगांमधील पोषक तत्वांबद्दल बोलायच झाल्यास हेल्थलाइननुसार, 100 ग्रॅम कच्चा शेंगांमध्ये 567 कॅलोरी, 6.5% वॉटर, 25.8 ग्राम प्रोटीन, 16.1 कार्ब्स, 4.7 शुगर, 8.5 फायबर आणि 15.56 ग्राम ओमेगा-6 सह बायोटिन, कॉपर, नियासिन, फोलेट, मॅगनीज, विटामिन ई, फास्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे मिनरल आणि न्यूट्रिएंट्स असतात. (Photo Credit : Pexels )

अनेकदा लोक टेस्ट चांगली लागते म्हणून जास्त भुईमुगाच्या शेंगा खातात. पण यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून मर्यादीत प्रमाणात आणि योग्य पद्धतीने डाएटमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. जाणून घ्या, एक्सपर्टकडून भुईमुगाच्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत काय?

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांनी सांगितलं की, भुईमुगाच्या शेंगा मर्यादीत प्रमाणात खाल्ल्या तर प्रोटीनचा चांगला सोर्स ठरतात. जर, एकादिवसात भुईमुगाच्या जास्त शेंगा खाल्ल्या तर पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात. एसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे सारख्या समस्या.

एक्सपर्टने सांगितलं की, भूईमुगाच्या शेंगा भिजवून खाल्ल्या पाहिजेत. खासकरुन थंडीच्या सीजनमध्ये. रात्रीच्यावेळी 20 ते 25 भुईमुगाच्या शेंगा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. दुसऱ्यादिवशी सकाळी त्याचं सेवन केलं जाऊ शकतं. हीच भुईमुगाच्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत आहे.

भुईमुगाच्या शेंगा या प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. त्यामुळे हाड मजबूत व्हायला मदत होते. भुईमुगाच्या शेंगा मसाला लावून खाऊ नयेत. नट्सपालून एलर्जी किंवा आरोग्याशी संबंधित कुठली समस्या असेल, तर एक्सपर्टकडून सल्ला घेता येईल.