
प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे डॉक्टरांकडची औषधे घेतल्यावर दारू प्यायलं पाहिजे का? दारू प्यायल्याने काय होतं?

सकाळी दारू प्यायल्यावर रात्री औषध घेऊ शकतो. कारण तोपर्यंत दारू उतरलेली असते असं तुम्हाला वाटत असेल तर मनातून हा विचार काढून टाका. कोणत्याही वेळी दारू प्यायल्यानंतर औषधे घेऊ नका. नाही तर त्याची उलटी रिअॅक्शन होऊ शकते.

दारू प्यायल्यानंतर औषधे घेतली तर आजारातून बरं होणं अवघड होऊन जातं. ज्या प्रमाणे पाहिजे तेवढा औषधांचा आजारांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रिकव्हरी हळूहळू होते. दारू प्यायल्याने तुमची एनर्जीही कमी होते. त्यामुळेच अँटिबायोटिक्स घेतल्यावर दारू पिऊ नये.

दारूमुळे यकृत, पाचन यंत्र आणि काळजावर परिणाम होतो. वारंवार दारू प्यायल्याने इम्युनिटी कमी होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. तुम्ही आजारी असाल आणि त्यात दारू घेत असाल तर दारू तुमचा आजार आणखी वाढवेल. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं.

दारू प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही आजारातून लवकर बरे होणार नाही.

दारू प्यायल्यानंतर औषधे घेतल्यास चक्कर येणे, चेहऱा लाल होणे, डोकेदुखी वाढणे आणि मळमळ उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे औषधे सुरू असताना दारू पिऊ नका.