

तूप : तूप हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नव्हे तर त्वचेसाठी त्याचा वापर फायदेशीर ठरतो. ओठ फाटले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी ओठांना तूप लावून थोडा वेळ बोटांनी मसाज करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा फरक दिसून येईल.

साय : सायीमध्येही खूप मॉयश्चरायझिंग गुणधर्म असतात. ओठांना आलेला कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर साय ओठांवर लावू हलक्या हाताने चोळावे.

लोणी ठरते गुणकारी : लोण्यामध्येही अनेक मॉयश्चरायझिंग घटक असतात हे तुम्हाला माहीत आहे का ? फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून दोन वेळा ओठांना लोणी लावून मसाज करावा.

नारळाचे तेल : सौंदर्य, आरोग्य आणि केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेल उत्तम आहे. म्हणूनच खोबरेल तेलाला अष्टपैलू म्हणतात. फाटलेल्या त्वचेची, आर्द्रता नसण्याची समस्या दूर करण्यासाठी नारळ तेलाचा मसाज हा सर्वोत्तम उपाय आहे.