
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याने बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित केला. आतापर्यंत कोणत्या टीममधील कोणत्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला या मोसमाच्या सुरुवातीआधी कोरोनाने गाठलं. देवदत्तला 22 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. देवदत्त तेव्हा आपल्या घरीच क्वारंटाईन होता.

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणालाही कोरोनाची बाधा झाला होती. आयपीएलच्या आधी तो पॉझिटिव्ह होता. नितीशने स्वत:ला अलगीकरणात ठेवलं होतं. 12 दिवस स्वत्रंत राहिल्यानंतर तो नेगेटिव्ह आला.

दिल्ली कॅपिट्ल्सचा फिरकीपटू अक्षर पटेलने 28 मार्चला मुंबईत सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिट्वह आला. यानंतर अक्षरने नियमांनुसार क्वारंटाईन कालावधी पू्र्ण केल्यानंतर तो नेगेटिव्ह आला. यानंतर अक्षर टीमसोबत जोडला गेला.

या मोसमात बंगळुरूकडून खेळणारा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सला कोरोनाने गाठलं. डॅनियल 3 एप्रिलला नेगेटिव्ह असल्याची माहिती टीम मॅनेजमेंटने दिली. मात्र 7 एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर डॅनियलला आवश्यक ते उपचार देण्यात आले.

कोलकाताचा मिस्ट्री बोलर वरुण चक्रवर्तीचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. वरुण बायोबबल भेदून रुग्णालयात आवश्यक स्कॅन रिपोर्टसाठी गेला होता. यावेळेस त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संदीप वॉरिअर