
काही क्षेत्रात उंचीशिवाय प्रगती होत नसल्याचे मानले जाते. फॅशन, सिनेसृष्टीसह अनेक क्षेत्रात मानवीय उंचीला सर्वाधिक महत्त्व आहे. अर्थात काही मानवी समूह हे उंचीबाबत अत्यंत पुढे आहेत. त्यांची उंची सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक आहे. रशिया आणि आफ्रिकन लोक उंच मानले जातात.

भारतातही काही जाती, जमाती या उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. अर्थात उंचीवरच सगळं अवलंबून असतं असं ही नाही. पण काहींज्या जेनेटीक्समध्येच उंची अंतर्भूत असते. आफ्रिकेतील काही जमातीमधील स्त्री-पुरुषांची उंची हा कौतुकाचा नाही तर प्रतिष्ठेचा विषय असतो.

आफ्रिका खंडात आजही अनेक जाती-जमाती त्यांच्या विविध परपंरा जपतात. आफ्रिकन लोक हे सध्याच्या जगापेक्षा अत्यंत वेगळे आहेत. केवळ परंपराच नाही तर शारिरीक दृष्ट्या सुद्धा ते बळकट आणि दणकट आहेत. त्यांच्या काही प्रथा अत्यंत खतरनाक आहेत.

आफ्रिकेतील या जमातींमध्ये डिंका (African Dinka Tribe) ही आदिवासी जमात अशीच खास आहे. दक्षिण सुडानमधील नील नदीच्या किनाऱ्यावर ही आदिवासी जमात वसलेली आहे. डिंका लोक हे पशुपालन आणि शेती करतात. पण ही जमात जगात सर्वाधिक उंचीची जमात म्हणून ओळखली जाते.

डिंका जमातीतील पुरुषांची सरासरी उंची 182.6 सेंटीमीटर इतकी आहे. तर महिलांची सरासरी उंची 176.4 सेंटीमीटर इतकी आहे. डिंक जमातीत 1.80 मीटर पेक्षा कमी असलेले लोक कमी उंचीचे मानले जातात. डिंका समुदायाच्या गावात तर जवळपास दोन मीटर उंचीच्या लोकांना मान वर करून पाहावे लागते.

डिंका लोक स्वतःला मोईनजुंग म्हणतात. म्हणजे लोकांचे लोक असा त्याचा अर्थ होता. या लोकांमध्ये मुलगी ही श्रींमती, समृद्धीचे प्रतिक मानण्यात येते. डिंका जमातीत जेव्हा मुलगा मुलीशी लग्न करतो, तेव्हा तो मुलीच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात हुंडा देतो.