रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी हा नेहमीच वजन कमी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Fitness Goals )
अनंत अंबानीने 18 महिन्यांमध्ये 118 किलो वजन कमी केलं होतं.
आता अनंत अंबानींची प्रेरणा घेत निता अंबानी यांनी सुद्धा वजन कमी केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान अनंतकडून प्रेरणा घेऊनच आपण वजन कमी केल्याची ग्वाही स्वत: निता अंबानी यांनी दिली आहे.
निता अंबानी यांनी जवळजवळ 40 किलो वजन कमी केलं आहे.
निता अंबानी या अनंत सोबत वर्कआउट आणि डायट करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.