कपडे आणि मूडबद्दल माधुरीचं मोठं वक्तव्य, हटके फोटो पोस्ट करत म्हणाली…
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 90 च्या दशकात माधुरीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने खास कॅप्शन देखील तिलं आहे. हटके लूकमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कपडे आणि मूडबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये माधुरी म्हणते, 'जेव्हा तुमचा मूड तुमच्या कपड्यांसोबत जुळतो...', माधुरी हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा समावेश होतो. माधुरीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले. 80 ते 90 च्या दशकात तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.