
माधुरी दीक्षित नेने हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. माधुरी दीक्षित ही एका कॉन्सर्टमध्ये पोहचली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही दिसत आहे.

कॉन्सर्टमध्ये माधुरी दीक्षित ही बियॉन्सेच्या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. माधुरी हिने याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पतीसोबत धमाल करताना माधुरी दीक्षित ही दिसत आहे. माधुरी दीक्षित हिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

माधुरी दीक्षित हिने एक खास नोट देखील लिहिली आहे. माधुरी दीक्षित हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, जगावर कोण राज्य करत आहे? त्यावर लिहिले की, मुली....

आता माधुरी दीक्षित हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. माधुरी दीक्षित हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.