Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा सोनेरी साडीत Golden Era लूक, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर खुललं सौंदर्य
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा सोनेरी सिल्क साडीतील सुंदर आणि आकर्षक लूक सध्या चर्चेत आहे. पारंपरिक दागिने आणि मोहक हास्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरील तिच्या या खास अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना भुरळ घालणारी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नव्या फोटोंमधील आकर्षक अंदाज आणि मोहक हास्य सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर माधुरी दीक्षित आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिच्या सहजसुंदर सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाच्या रंगतदार वातावरणात आणखी भर पडत आहे.
माधुरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक पेहराव विशेष लक्षवेधी ठरत आहे. सोनेरी सिल्क साडीतील तिचा एलिगंट लूक आणि त्याला साजेसा ब्लाऊज यामुळे तिच्या सौंदर्याची वेगळीच झलक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या या खास लूकला पारंपरिक दागिन्यांची सुंदर जोड मिळाली आहे. गळ्यातील हार, हातातील पाटल्या आणि कपाळावरील नाजूक टिकली यांमुळे माधुरीचा संपूर्ण लूक अधिकच देखणा आणि आकर्षक दिसत आहे.
माधुरी दीक्षितचा अभिनय, नृत्य आणि फॅशन सेन्स यांची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. यावेळीदेखील तिच्या सोनेरी साडीतील फोटोंनी लक्ष वेधून घेतले असून, तिच्या पारंपरिक लूकमधील सौंदर्याची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.