याहून सुंदर काय असू शकतं? पटोला साडीत माधुरी दीक्षितचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
माधुरी दीक्षितचा गणेशोत्सवासाठी सुंदर पारंपरिक साज; पटोला साडीतील मनमोहक लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष. सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक.

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फॅशनसाठीही ओळखली जाते.
गणेशोत्सवाच्या खास प्रसंगी माधुरीने केलेल्या सुंदर पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
माधुरीने या खास प्रसंगासाठी लाल, हिरवा आणि निळ्या रंगांची पारंपरिक पटोला प्रिंटची सिल्क साडी नेसली आहे. साडीवरील बारकाईने केलेले भरतकाम आणि नाजूक गोटा-पट्टीची बॉर्डर तिच्या लूकमध्ये अधिकच आकर्षक भर घालत आहे.
या साडीला साजेसा मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेला डिझायनर ब्लाऊज तिने परिधान केला आहे. आपल्या पारंपरिक लूकला उठाव देण्यासाठी माधुरीने कुंदन आणि मोत्यांचे सुंदर झुमके, तसेच चांदबाली स्टाइलचे दागिने घातले आहेत.
हातात नक्षीकाम केलेले कडे आणि बोटात मोठी डिझायनर अंगठी परिधान करून तिने आपला लूक पूर्ण केला आहे. तिच्या या साध्या, सोज्वळ आणि पारंपरिक अंदाजाचे चाहते कौतुक करत आहेत.