जेवायला चल, फिरायला नेतो…गणिताच्या शिक्षाकाचा विद्यार्थिनीवर दबाव, संतापजनक प्रकार समोर!
शिक्षकाच्या या कृतीला विद्यार्थिनीने विरोध केला होता. मात्र, शिक्षकाडून तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. नकार दिल्यास परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी शिक्षकाकडून दिली जात असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

एका सरकारी शाळेतील शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षक अश्लील मेसेज पाठवत असल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा शिक्षकावर आरोप आहे.
नरेंद्र कुशवाह असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो सरकारी शाळेत गणित विषय शिकवतो. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, तो तिला वारंवार मेसेज करून फिरायला आणि जेवायला जाण्याचे आमिष दाखवत होता. एवढेच नाही, तर संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला शारीरिक संबंध ठेवण्यासही विचारणा केल्याचा आरोप केला जातोय.
शिक्षकाच्या या कृतीला विद्यार्थिनीने विरोध केला होता. मात्र, शिक्षकाडून तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. नकार दिल्यास परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी शिक्षकाकडून दिली जात असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी संबंधित शाळेत जाऊन कारवाई केली. यावेळी आरोपी शिक्षक नरेंद्र कुशवाह याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
दरम्यान, मध्य प्रदेशातील गुना येथील ही घटना असून हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकानेच हा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात असून संबंधित शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जातेय.