सात समुद्रापार ढोल पथक, सलग 2 तास धमाकेदार परफॉर्मन्स

Ganesh Visarjan 2023 | महाराष्ट्रात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना त्याचा उत्साह देश-विदेशातील नागरिकही पाहत आहेत. स्वीडनमधील महाराष्ट्रीयन मंडळींनी एकत्र येत नवीन पायंडा पडला. मराठी संस्कृती स्वीडनमधील रस्त्यांवर दिसली.

| Updated on: Sep 29, 2023 | 12:27 PM
1 / 5
पुणे, मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरु असताना सात समुद्रापार महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचा यशस्वी प्रयत्न मराठीजणांनी केला. मुंबई, पुणेमधील ढोल-ताशा पथकाप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स स्वीडनमध्ये दिसला. स्वीडनमधील नागरिकांनी त्याला चांगलीच दाद दिली.

2 / 5
स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात करण्यात आली. त्यासाठी स्वीडनमधील मराठीजणांनी ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केली. या पथकाने स्वीडनमधील गणेश मंदिरात पहिला परफॉर्मन्स सादर केला. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

3 / 5
 स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये अभिनय सरकटे यांनी ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. तसेच गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले. या दोघांनी एकत्र येऊन दमदार सादरीकरण स्वीडनमधील रस्त्यांवर केले.

4 / 5
गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त या पथकाने सलग 2 तास परफॉर्मन्स केला. यावेळी बाप्पा मोरयाचा जयघोष सुरु होता. ढोल-ताशाच्या तालावर स्वीडमध्ये असलेल्या मराठीजणांनी ठेका धरला. सातासमुद्रापार महाराष्ट्रीयन सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार या मंडळींकडून होत आहे.

5 / 5
स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली वेशभूषा या पथकाने परिधान केली होती. त्यावेळी स्वीडिश भूमीवर भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव सादर करण्यात आला. या प्रयत्नास स्वीडनमधील नागरिकांनी प्रतिसाद दिला.