हुबेहूब रुपाली चाकणकरच… सेम लूक, सेम स्टाईल, दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर, लिंगपिसाट खरातवरील चित्रपट गाजणार?
Maharashtra Epstein Files : अशोक खरातवरील सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आता त्यांच्या लूकचे फोटो समोर आले आहेत.

अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली. आता यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे.

अशोक खरातवरील या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आता सय्यद यांचे रुपाली चाकणकर यांच्या वेशातील फोटो समोर आले आहेत.

यात दीपाली सय्यद या हुबेहुब रुपाली चाकणकर यांच्यासारख्या दिसत आहेत, या लुकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपाली सय्यद यांनी या लूकबाबत बोलताना म्हटले की, 'मी रूपाली चाकणकर यांच्या लोक बघितलं. मी त्यांचा रिसर्च केलं, काय घालतात, कशापद्धतीने साडी असते, हेअर स्टाईल कशी असते? त्यांची ज्वेलरी काय असते? सगळे सर्च केल्यानंतर फर्स्ट डेला लुक केला तो प्रॉपर आला.

पुढे बोलताना दीपाली सय्यद यांनी म्हटले की, 'काल टिझर बघितल्यानंतर लोकांना प्रचंड लूक आवडला आहो, कारण लुक सेम आलेला आहे.' दरम्यान हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.