Raj Thackeray : मला जे काय बोलायच ते..मनसेच्या वर्धापनदिनी रायगडाच्या पायथ्यावरुन राज ठाकरेंची गर्जना

Raj Thackeray : मनसेचा आज 20 वा वर्धापन दिन आहे. मनसेच्या स्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अस्तित्वात आला. आज रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या वर्धापनदिनाचा छोटेखानी कार्यक्रम झाला.

| Updated on: Mar 09, 2026 | 11:28 AM
1 / 5
20 व्या वर्धापनदिनाच्या सर्व मनसैनिकांना मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी आपण वर्धापनदिन हॉलमध्ये साजरा करतो. तिथे तुम्ही येता. 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला गुढीपाडवा मेळावा. म्हटलं जे काय बोलायच ते 19 तारखेलाच बोलून टाकू.

2 / 5
 म्हणून मग ठरवलं की, 9 तारखेला पक्ष सदस्य नोंदणी सुरु करु. आज महाराष्ट्रातल्या सर्व सहकाऱ्यांना माझं आवाहन आहे की, अनेक लोकांना आपल्या पक्षाच सक्रीय सदस्य व्हायचं आहे. तर ज्या वर्दळीच्या जागा असतील शाळा, कॉलेजं, मंदिर असतील तिथे आपल्या मनसे सदस्य नोंदणीचा स्टॉल लागला पाहिजे.

3 / 5
तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचं आहे. त्यांना सदस्य करुन घ्या. आज महाराजांच्या आशिर्वादाने रागयडावर सदस्य नोंदणीला सुरुवात करत आहोत.

4 / 5
येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी यायचं आहे. योगायोग बघा 20 वर्षांपूर्वी 19 मार्चला शिवतीर्थावर पक्षाची पहिली सभा झाली. आता 20 वर्षांनी 19 मार्चलाचा गुढी पाडवा येत आहे.

5 / 5
तुम्ही सर्वांनी गुलाल उधळत, जल्लोषात शिवाजीपार्कवरील सभेला या. आज इथे सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरवात झाली असं मी जाहीर करतो. राज ठाकरे यांनी आज राजकीय भाष्य करणं टाळलं. ते 19 तारखेला गुढी पाडव्याच्या सभेतच बोलतील.

Follow Us