IMD Rain Alert : मोठी बातमी! चक्रीवादळामुळं वारं फिरलं, राज्यात वादळी पाऊस होणार, IMD चा महत्त्वाचा अंदाज समोर!

दरम्यान, हे चक्रिवादळ 27 ऑक्टोबर रोजीपर्यंत आंध्र प्रदेशच्या सागरी किनाऱ्यावर धडकण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश तसेच ओडिसा राज्याला रेड अलर्ट जारी केलाय.

| Updated on: Oct 26, 2026 | 4:28 PM
1 / 5
बंगालच्या खाडीत सध्या निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विक्राळ रुप धारण करत आहे. या भागात चक्रीवादळ तयार झाले असून त्याला अर्नब असे नाव देण्यात आले आहे.

बंगालच्या खाडीत सध्या निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विक्राळ रुप धारण करत आहे. या भागात चक्रीवादळ तयार झाले असून त्याला अर्नब असे नाव देण्यात आले आहे.

2 / 5

दरम्यान, हे चक्रिवादळ 27 ऑक्टोबर रोजीपर्यंत आंध्र प्रदेशच्या सागरी किनाऱ्यावर धडकण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश तसेच ओडिसा राज्याला रेड अलर्ट जारी केलाय.

3 / 5

याच अर्नब चक्रिवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम पडणार का? असे विचारले जातेय. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आलीय. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार येणाऱ्या येत्या 28 ते 30 ऑक्टोबरच्या काळात महाराष्ट्रातील विदर्भात पाऊस पडू शकतो.

4 / 5

विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे असे सांगितले जातेय.

5 / 5

दरम्यान, हा अंदाज खरा ठरला तर विदर्भासाठी हा मोठा आणि महत्त्वाचा दिलासा मानला जाऊ शकतो. अगोदरच रबी हंगामात कमी पेरणी झालेली आहे. असे असताना विदर्भातील पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us