
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.

राज्यात तुफान पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत.

नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेत आहेत.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाच्या तडाख्यात सिमेंटमध्ये उभे असलेले लोखंडी पोल अशा पद्धतीने उध्वस्त झाले आहेत.

तिथे पिकांचे काय झाले असेल याची कल्पना सहजच येईल.

पावसाने शेतच वाहून गेले, तिथे पंचनामे कशाचे करणार, असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पलूस-कडेगाव, सांगलीत परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे.

कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा येथील शहाजी घागरे यांच्या शेतातील कारलं आणि टोमॅटो या पिकांचं नुकसान झालं.

पावसामुळे पिकांचंच नाही तर घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.