
कोरोनाच्या काळात खूप वेळ वाया गेला. पण या काळात परदेशी आणि देशातील उद्योजकांसोबत करार केले. 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत आहे. यामुळे राज्याचं अर्थकारण वाढेल.तीन लाख तरुण तरुणीला रोजगार मिळणार आहे. रोजगार निर्मिती होते हे महत्त्वाचं आहे. अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते टीव्ही9 मराठीच्या महा इन्फ्रा कन्क्लेव्हमध्ये (MahaInfra Conclave) कार्यक्रमात बोलत होते.

कोणत्याही राज्यात उद्योजक पहिले संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत असतात. सोयी सुविधा आहेत का? याची माहिती घेत असतो. राज्य सरकारने उद्योगाची काही क्षेत्रे निवडली आहेत.ती विकसीत कसे करता येईल यावर सध्या काम चालू आहे.

या उपक्रमांमध्ये नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

राज्यात डेटा सेंटरसाठी नवं धोरण आणलं आहे. अनेक कंपन्यांनी त्यात रसही दाखवला आहे. देशातील आणि परदेशातील किरकोळ व्यापाऱ्यातील मोठ्या उद्योगांनी त्यात गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. भारत सरकारने भारतातील माहिती भारतात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत इंडस्ट्रीयल मिनरल आणि केमिकलची कंपनी बऱ्याच वर्षांपासून बंद पडली होती. त्यामध्ये मध्यस्ती करून भूखंड काढून घेतला. हा भूखंड आता टाटा समूह आणि अॅक्टिस या कंपनीला दिलाय. त्यामधून मोठा माहिती तंत्रज्ञानावर आधारित आयटी पार्क, डेटा सेंटर, कमर्सीअल काम्प्लेक्स उभारण्यात येतोय.