31 दिवसात 4,636 युनिट्सची खरेदी! ‘ही’ कार आहे 7 प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे वर्चस्व वाढत आहे. लोक या वाहनांना अधिक पसंती देत आहेत आणि या पसंतीचा फायदा टाटा व महिंद्रासारख्या कंपन्यांना होत आहे.

ऑक्टोबरमध्ये विक्रीत वाढ: Mahindra XEV 9S ने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 4,865 युनिट्सच्या विक्रीची नोंद केली. सप्टेंबर 2026 मध्ये या SUV च्या 4,636 युनिट्सची विक्री झाली होती म्हणजेच महिन्याभरात विक्रीत 4.94 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे आकडे SIAM च्या डिस्पॅच डेटावर आधारित असून रिटेल विक्रीचे आकडे नाहीत.
तीन बॅटरी पर्याय आणि 679Km पर्यंतची रेंज: Mahindra XEV 9S मध्ये 59kWh, 70kWh आणि 79kWh असे तीन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. 59kWh बॅटरीमध्ये 521Km, 70kWh मध्ये 600Km आणि 79kWh बॅटरीमध्ये 679Km रेंजचा दावा करण्यात आला आहे. या SUV च्या सर्व व्हेरिएंटमध्ये रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) सिस्टम मिळते. टॉप व्हेरिएंटमध्ये 286hp पॉवर आणि 380Nm टॉर्क मिळतो.
फास्ट चार्जिंगची सुविधा: या इलेक्ट्रिक SUV मध्ये AC आणि DC अशा दोन्ही चार्जिंग सुविधा देण्यात आल्या आहेत. 180kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने 79kWh बॅटरी 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतात. 7.2kW AC चार्जरने पूर्ण चार्जिंगसाठी 11.7 तास, तर 11.2kW AC चार्जरने सुमारे 8 तास लागतात. बॅटरीच्या क्षमतेनुसार DC चार्जिंगचे पर्यायही वेगवेगळे आहेत.
प्रीमियम फीचर्स आणि 6-7 सीटरचा पर्याय: Mahindra XEV 9S मध्ये तीन 12.3 इंच स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 16-स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टम मिळते. याशिवाय वायरलेस Android Auto, Apple CarPlay आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स आहेत. दुसऱ्या रांगेत व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर्ड बॉस मोड आणि सनशेडची सुविधा मिळते. ग्राहकांना या SUV मध्ये 6-सीटर आणि 7-सीटर असे दोन पर्याय निवडता येतात.
सुरक्षेच्या बाबतीत 5-स्टार रेटिंग: Mahindra XEV 9S ला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या SUV ने अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 32 पैकी 31.15 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले. यामध्ये 7 एअरबॅग्स, लेव्हल 2+ ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो. ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि ड्रायव्हर स्लीप मॉनिटरिंग सिस्टमसारखी सुरक्षा फीचर्सही देण्यात आली आहेत.
Mahindra XEV 9S ची किंमत किती?: Mahindra XEV 9S ची लॉन्चवेळची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपये होती. तर टॉप Pack Three Above व्हेरिएंटची सुरुवातीची घोषित किंमत 29.45 लाख रुपये होती. कंपनीने 6-सीटर पर्यायही सादर केला असून तो संबंधित 7-सीटर व्हेरिएंटपेक्षा 25,000 रुपये महाग आहे. बॅटरी पॅक, सीटिंग लेआउट आणि व्हेरिएंटनुसार या SUV ची किंमत बदलते.