AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 दिवसात 4,636 युनिट्सची खरेदी! ‘ही’ कार आहे 7 प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे वर्चस्व वाढत आहे. लोक या वाहनांना अधिक पसंती देत ​​आहेत आणि या पसंतीचा फायदा टाटा व महिंद्रासारख्या कंपन्यांना होत आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 12:20 PM
Share
ऑक्टोबरमध्ये विक्रीत वाढ: Mahindra XEV 9S ने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 4,865 युनिट्सच्या विक्रीची नोंद केली. सप्टेंबर 2026 मध्ये या SUV च्या 4,636 युनिट्सची विक्री झाली होती म्हणजेच महिन्याभरात विक्रीत 4.94 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे आकडे SIAM च्या डिस्पॅच डेटावर आधारित असून रिटेल विक्रीचे आकडे नाहीत.

1 / 6
तीन बॅटरी पर्याय आणि 679Km पर्यंतची रेंज: Mahindra XEV 9S मध्ये 59kWh, 70kWh आणि 79kWh असे तीन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. 59kWh बॅटरीमध्ये 521Km, 70kWh मध्ये 600Km आणि 79kWh बॅटरीमध्ये 679Km रेंजचा दावा करण्यात आला आहे. या SUV च्या सर्व व्हेरिएंटमध्ये रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) सिस्टम मिळते. टॉप व्हेरिएंटमध्ये 286hp पॉवर आणि 380Nm टॉर्क मिळतो.

2 / 6
फास्ट चार्जिंगची सुविधा:  या इलेक्ट्रिक SUV मध्ये AC आणि DC अशा दोन्ही चार्जिंग सुविधा देण्यात आल्या आहेत. 180kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने 79kWh बॅटरी 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतात. 7.2kW AC चार्जरने पूर्ण चार्जिंगसाठी 11.7 तास, तर 11.2kW AC चार्जरने सुमारे 8 तास लागतात. बॅटरीच्या क्षमतेनुसार DC चार्जिंगचे पर्यायही वेगवेगळे आहेत.

3 / 6
प्रीमियम फीचर्स आणि 6-7 सीटरचा पर्याय: Mahindra XEV 9S मध्ये तीन 12.3 इंच स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 16-स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टम मिळते. याशिवाय वायरलेस Android Auto, Apple CarPlay आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स आहेत. दुसऱ्या रांगेत व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर्ड बॉस मोड आणि सनशेडची सुविधा मिळते. ग्राहकांना या SUV मध्ये 6-सीटर आणि 7-सीटर असे दोन पर्याय निवडता येतात.

4 / 6
 सुरक्षेच्या बाबतीत 5-स्टार रेटिंग:  Mahindra XEV 9S ला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या SUV ने अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 32 पैकी 31.15 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले. यामध्ये 7 एअरबॅग्स, लेव्हल 2+ ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो. ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि ड्रायव्हर स्लीप मॉनिटरिंग सिस्टमसारखी सुरक्षा फीचर्सही देण्यात आली आहेत.

5 / 6
Mahindra XEV 9S ची किंमत किती?: Mahindra XEV 9S ची लॉन्चवेळची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपये होती. तर टॉप Pack Three Above व्हेरिएंटची सुरुवातीची घोषित किंमत 29.45 लाख रुपये होती. कंपनीने 6-सीटर पर्यायही सादर केला असून तो संबंधित 7-सीटर व्हेरिएंटपेक्षा 25,000 रुपये महाग आहे. बॅटरी पॅक, सीटिंग लेआउट आणि व्हेरिएंटनुसार या SUV ची किंमत बदलते.

6 / 6
Follow Us
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट