
सर्वात पहिलं म्हणजे काकडी, वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा आहारामध्ये समावेश करा. काकडी खाल्ल्याने तुमची भूक भागेल. काकडीमध्ये कमी प्रमाणात उष्णता असते. त्यासोबतच त्यामध्ये फायबर असते आणि काकडी खाल्ल्याने पाण्याची कमतरताही पूर्ण होते.

काकडीनंतर टरबूज म्हणजेच आपल्याकडे त्याला कलिंगडही बोललं जातं. कलिंगड खाल्ल्याने तुमचं पोट भरते आणि वजनही कमी होते. भूक लागल्यावर एक प्लेट कलिंगड खाल्ले तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. कमी कॅलरी आणि फायबरचेही प्रमाण कलिंगडमध्ये असलेले पाहायला मिळते.

मखाणा तुम्ही नाश्त्यामध्येही खाल्लात तर हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. भूक लागली असेल तर मखाणा खाल्लात तर आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. एक प्लेट मखाणा खाल्ला तरी तुमच्यासाठी फायद्याचं ठरेलं. वजन कमी करण्यासाठी मखाणा चांगला पर्याय आहे.

वजन कमी करण्यासाठी जेवणाची वेळ सोडून बाकी ज्या वेळेत भूक लागते तेव्हा मिक्स सॅलडचा खाण्यामध्ये समावेश करावा. मिक्स सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो आणि लेट्युस खाऊ शकता. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे वनज कमी कऱण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि भूकही भागून जाते.