Male fertility : या घातक सवयींमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता घसरते

आजच्या लाईफस्टाईलचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहेत, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घटत आहे. काही वाईट सवयींमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलतेला हानी पोहोचते, कोणत्या त्या सवयी पाहूयात..

| Updated on: Feb 15, 2026 | 11:24 PM
1 / 7
धावपळीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहेत. काही चुकीच्या सवयींमुळे पुरुष शुक्राणूंची संख्या घटत आहे. दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळे हळूहळू पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो असे आरएमएल रुग्णालयाच्या औषध विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ. सुभाष गिरी यांनी म्हटले आहे.

2 / 7
पुरुषांच्या पुनरुत्पादकतेसाठी शुक्राणूंची गुणवत्ता खूप महत्वाची असते. चांगली गुणवत्ता म्हणजे त्यांची पुरेशी संख्या, योग्य आकार आणि चांगली गतिशीलता आवश्यक असते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढत असते.

3 / 7
 शुक्राणूंची कमी संख्या किंवा खराब गुणवत्तेमुळे गर्भधारणेत अडथळा येऊ  शकतो, हार्मोनल असंतुलन, थकवा आणि मानसिक ताण यामुळेही शुक्राणूंची गुणवत्ता घसरु शकते

4 / 7
चुकीच्या आहाराच्या सवयी, वाढता ताण आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीरावर परिणाम होतो. ज्यामुळे हळूहळू प्रजनन क्षमतेला धोका पोहचतो.शुक्राणूंच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे त्यासाठी खूप महत्वाचे आहे.चला जाणून घेऊया कोणत्या सवयी शुक्राणूंची गुणवत्ता खराब करतात.

5 / 7
झोपेचा अभाव आणि रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय देखील प्रजनन आरोग्यासाठी हानिकारक आहे. सतत जंक फूड आणि पोषक तत्वांचा अभाव असलेला आहार शरीराला कुपोषित करतो.तसेच, शारीरिक हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ बसून काम केल्याने शुक्राणूंच्या आरोग्यावर मोठा निगेटिव्ह परिणाम होतो.अशा सवयी कालांतराने गंभीर समस्या निर्माण करू शकतात.

6 / 7
शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे असते. फळे, भाज्या आणि प्रोटीनयुक्त संतुलित आहार घेणे गरजेचे असते.

7 / 7
 दररोज हलका व्यायाम किंवा योगासने करावीत. पुरेशी झोप घ्यावी आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. पुरेसे पाणी प्या आणि मद्यपान आणि धूम्रपान टाळावे.